Anniversary gift for my Jijabai and Shahaji!
Here is a poem I wrote for my Aai and Baba, for their wedding anniversary. It is in Marathi, so needless to say that my aai and baba had their first reaction as "aaa??!" but then they couldn't stop praising me..... Well, each and every word of the poem is true. But as it is in marathi, 75% of my audience won't understand it. Nevertheless, here it is. Happy anniversary again to my Aai and Baba.
आई बाबांची गोष्ट
३८ वर्षांपूर्वी जेव्हा दोन देश लढाईत होते मग्न
मुंबईत तेव्हा भडजी बुवा लावत होते एक लग्न
हे लग्न थोडे नवीन, थोडे वेगळे
हातावरच्या रेघा जुळवून आयुष्याचा नकाशा तयार करण्याचे
एक-मेकांना समजून ऋणानुबंध बांधण्याचे
येणाऱ्या पुढच्या पिढीला नात्यांची समज देण्याचे
नकाशा घेऊन संसाराची ईमारत बांधायला तर घेतली
पण १० वर्ष दोघच बांधून बांधणार तरी किती ?
भाचे, भाच्या, ह्या सगळ्यांना खेळवून तर झाले
पण आपले स्वतःचे अजून मूल नाही, याचे वाईट तर नक्कीच वाटले
१० वर्षानंतर देवाच्या कृपेने आला देवदत्त गुणी छान
अजून ४ वर्षांनी त्याला सोबत म्हणून आला अश्विन लहान
मग काय, आनंदाला तर राहीले नाही भान
मुलांचे हसणे आणि कधी कधी रडणे ऐकून संतुष्ट झाले कान
एवढी वर्ष झाली , आता आली एक छान कुलवधू
अत्त्या आणि काका म्हणून घेता घेता तिच्याशी नवीन प्रेमाचे नाते जोडू
पिल्लू म्हणता म्हणता , झाला एका पिल्लाचा संसार सुरु
दुसऱ्या पिल्लाचा मार्ग झाला मोकळा, आता त्याची काळजी करू
आपले दुसरे सुपुत्र काय दिवे लावतात, आता हे तरी बघू
२६ वर्ष दोन्ही मुलांना सगळ्या जगाहून सांभाळले
त्यांच्या अवती भवती आपले विश्व विणून, त्यालाच आपले सूख मानले
आता पिल्ले उडून गेली, झाले घरटे रिकामे
पिल्लांची किलबिल झाली नाहीशी, शांतता ऐकणे झाले नकोसे
आता दिवस पिल्लांची आठवण काढण्याचे
जुन्या आठवणी आठवून मनातल्या मनात हसण्याचे आणि रडण्याचे
पण हे दिवस खरे तर नाही दुःखाचे
दिवस आहेत आता पिल्लांची चिंता करता करता स्वतःकडे लक्ष्य देण्याचे
परत आहे आता हाती वेळ सगळे जुने छंद जोपासायला
संसार करता करता अर्धवट राहिलेले पुस्तक वाचायला
एक-मेकांशी परत पूर्वी सारख्या गप्पा मारायला
भविष्यात नातवंडांना सांगायच्या गोष्टी बनवायला
३८ वर्ष झाली, काळ नाही हा थोडा
पण ही ईमारत अजून पूर्ण नाही, बाकीच्या रेघा तर जोडा
एवढ्या वर्षात पहिल्या नकाश्यात झाले बरेच बदल
पण तुम्ही केलेल्या मेहनतीचे आणि संस्कारांचेच आहे हे फळ
३८ वर्ष झाली , ह्याला एक पर्व समजा
पुढे अजून बरेच चालायचे आहे हे लक्षात ठेवा
असेच एकत्र आमच्या बरोबर चालत रहा, मार्ग आहे मोठा
मुलांना चालायला शिकवलय, तरी चाल ठीक आहे न, हे तर पहा
असेच तुमचे मार्गदर्शन आम्हाला जन्मभर मिळावे
बोट धरून जरी नाही तरी डोक्यावर हात ठेवून असावे
म्हणून ह्या दिवशी सगळ्या देवांशी एकच ही प्रार्थना
माझ्या आई बाबांची ही जोडी, सदैव अशीच सुंदर ठेवा

-Ashwin Ranade
4 comments:
Lovely poem Ashwin. I can imagine kaka-kaku's reaction to this... :) I can only say that I've never read such a beautiful poem.
And yes I love this line:
संसार करता करता अर्धवट राहिलेले पुस्तक वाचायला :)
Sonal
@Vaidehee...
Hi
Thanks a ton for the compliments.
And yes, Aai and Baba were left speechless :)
mast aahe kavita. Overall blog pan sundar aahe. :)
Mast aahe kavita. Overall blog pan sundar aahe. :)
Post a Comment